रेवदंडयात इंडिया आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

| रेवदंडा | वार्ताहर |

रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ पारनाका येथून करण्यात आला. तत्पुर्वी रेवदंडयाचे आध्यदैवत श्री मारूतीरायांचे मंदिरात जेष्ठ कार्यकर्ते सदाशिव मोरे, हेमंत गणपत व सुरेश खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. रेवदंडा शेकाप व काँग्रेस आघाडीचे रेवदंडा व थेरोंडा विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी शेकाप व काँग्रेस आघाडी सरपंचपदाचे थेट उमेदवार संदिप खोत यांचे शुभहस्ते श्री मारूतीरायांय पुष्पमालिका अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक येत्या 5 नोव्हेंबर रोजी घेण्यात येत असून शेकाप व काँग्रेस आघाडीचे वतीने संदिप खोत थेट सरपंचपदाची निवडणूक लढवित आहेत. तर, ग्रामपंचायत सदस्यासाठी प्रभाग 1 मधून राजेंद्र सदाशिव वाडकर, मनिषा मिंलिद चुनेकर, गोंधळी प्रिती आशिष, प्रभाग 2 मधून कोंडे उमेश रामचंद्र, कोंडे शुभांग रघुनाथ, पाटील उषा परशुराम, प्रभाग 3 मधून रोहिदास रामचंद्र वाघमारे, सोनाली स्वप्नील रानवडे, प्रभाग 4 मधून दरोडया हाश्या खेळया व अशोक वसंत अंबुकर, प्रभाग 5 मधून संतोष सदाशिव मोर, स्नेहल शेखर बळी, मानकर लिना किशोर, प्रभाग क्रमांक 6 मधून मनिषा मिलिंद चुनेकर, तांडेल खलिल युनूस, सचिन पाटील व जयश्री अजीत पाटील हे निवडणुक लढवित आहेत.

Exit mobile version