| पनवेल | वार्ताहर |
सरकारला प्रश्न विचारले म्हणून 141 खासदारांचे निलंबन केल्या बद्दल पनवेलमध्ये भाजप सरकारविरोधात इंडिया आघाडीच्यावतीने शुक्रवार (दि.22) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. एकिकडे जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले म्हणून महासंसदरत्न पुरस्कार जाहीर होतो. तर, दुसरीकडे जनतेचे प्रश्न मांडून सरकारची कोंडी केली म्हणून खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा आरोप यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला.
याप्रसंगी माजी आ. बाळाराम पाटील, जे एम म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हासंपर्कप्रमुख बबन पाटील, शिरीष घरत, सुदाम पाटील, प्रशांत पाटील, सूरदास गोवारी, सतीश पाटील, आर सी घरत, नंदराज मुंगाजी, वैशाली कोळी, जी आर पाटील, लतीफ शेख, भावना घाणेकर, शशिकला सिह, श्रुती म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, अनुराधा ठोकळ, रवी भगत, यांच्यासह नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
इंडिया आघाडीचे आंदोलन
