पराभवाच्या भीतीने भारत खेळण्यास घाबरतो

पाकच्या माजी खेळाडूचे वादग्रस्त विधान

| इस्लामाबाद | वृत्तसंस्था |

पराभवाच्या भीतीने भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळायला घाबरत असल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाकने याने केले आहे. विश्वचषकापूर्वी वादग्रस्त विधान केल्याने क्रिकेट विश्वात त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. हा सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याआधी, आशिया चषक 2023 मध्ये दोन्ही संघांमध्ये किमान 2 सामने खेळले जातील. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये 3 सामने पाहायला मिळतील. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना रज्जाक यांने भारताला डिवचले आहे.

रझ्झाक म्हणाला की, भारत नेहमीच पराभूत होत असल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळत नाही. तो पुढे म्हणाला की, भारत हा एकमेव संघ आहे जो पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देतो. आम्ही सर्व संघांविरुद्ध आदर आणि मैत्री कायम असून आमच्या संबंधांवर शंका घेणारे फक्त बीसीसीआय आहे. भारत हा एकमेव देश आहे जो पाकिस्तानविरुद्ध कोणतीही मालिका खेळण्यास नकार देतो. यामागेही एक कारण आहे, पराभवाच्या भीतीने ते असे करतात. पाकिस्तान संघाविरुद्ध आपण जिंकू शकणार नाही, अशी भीती त्यांना वाटते. यापूर्वीही भारताविरुद्ध पाकिस्तानचे वर्चस्व होते आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.असे तो बोलला.

2003 पासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अनेक बदल झाले आहेत. मात्र, तरीही आपण तिथेच अडकलो आहोत. आपण सर्वांनी आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. आता दोन्ही संघ खूप मजबूत आहेत आणि तुम्ही म्हणू शकत नाही की पाकिस्तान कमकुवत आहे. ॲशेस मालिका प्रत्येकजण पाहत असला, यात कोणता संघ अधिक मजबूत आहे हे कोणी सांगू शकेल? कारण जो संघ मैदानात चांगला खेळेल आणि दडपण हाताळेल, तोच आताच्या काळात जिंकेल.

अब्दुल रज्जाक,माजी क्रिकेटपटू
Exit mobile version