न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर

| मुंबई । वृत्तसंस्था ।

भारत आणि न्यूझीलंड संघात होणार्‍या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणार्‍या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी देखील टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने हे तीन संघ शुक्रवारी जाहीर केले. ज्यामध्ये काही खेळाडूंचे पुनरागमन झाले, तर काही खेळाडूंना वगळण्यात आले.

भारत आणि न्यूझीलंड संघातील वनडे मालिकेत तीन सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेला 18 जानेवारीपासून होईल. तसेच या मालिकेत संघाची धुरा रोहित शर्माकडे असणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 27 जानेवारीपासून सुरुवात होईल. या मालिकेतील कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. धुरा पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र सिंग चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्‍विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मज शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

Exit mobile version