। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला दुसर्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे. या पराभवामुळे भारताची जागतीक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील वाट बिकट होण्याची शक्यता आहे.
दुसर्या कसोटी सामन्याआधी भारताचे 68.06 गुण झाले होते. पण पराभवानंतर आता 62.82 पॉइंट झाले आहेत. भारतानंतर गुणतालीकेत ऑस्ट्रेलिया दुसर्या क्रमांकावर आहे. जागतीक कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील शर्यत रंगतदार होणार आहे. अद्याप पाच संघ या शर्यतीत आहेत. फक्त वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. जो संघ 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवेल तो अंतिम सामन्यात पोहोचण्याची शक्यता आहे. भारताने गेल्यावेळी 58.8 टक्के गुणांसह अंतिम फेरी गाठली होती. यावेळी भारताला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.
किवी, कांगारूंना नमवणे गरजेचे
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताच्या 6 कसोटी शिल्लक आहेत. यातील तीन कसोटी जिंकल्या आणि तीन गमावल्या तर भारताचे गुण 58.77 इतके होतील. असे झाल्यास ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड बाजी मारू शकतात. भारताला जर अंतिम सामना खेळायचा असेल तर न्यूझीलंडविरुद्धची शेवटची कसोटी जिंकावी लागेल. यानंतर ऑस्ट्रेलियाला पुढच्या कसोटी मालिकेत हरवावे लागेल. यामुळे भारताचे गुण 64.04 टक्क्यांच्या वर राहतील.