| बार्बाडोस | वृत्तसंस्था |
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे. पहिला सामना गुरुवारी (27 जुल) बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. दुसरा सामना 29 रोजी आणि शेवटचा एकदिवसीय सामना 1 ऑगस्ट रोजी होईल. रोहित शर्मा आणि शाई होप कर्णधार म्हणून आमनेसामने असतील. या मालिकेत कोणाला संधी द्यायची हे रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन ठरवणार आहेत.
या मालिकेच्यानिमित्ताने आशिया चषकासाठी विचार केला जात असून त्यानुसार अंतिम 11 मध्ये संधी देण्यात येणार आहे. या मालिकेकडे विश्वचषकाची तयारी म्हणूनही पाहिले जात आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला यावेळी वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवता आले नाही. विंडीज विश्वचषक न खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
किंग्स्टन ओव्हल स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 44 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने येथे 3 वन डे सामने खेळले आहेत. या मैदानावर 2002 मध्ये भारताने शेवटचा वन डे सामना खेळला होता, ज्यामध्ये भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. या मैदानावरील शेवटचा सामना ऑगस्ट 2022 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड होता, जो न्यूझीलंडने 5 गडी राखून जिंकला होता. या मैदानावर वेस्ट इंडिजने गेल्या 5 पैकी 3 सामने गमावले आहेत.
संघ नव्या जर्सीत
या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी फोटोशूट करून घेतले, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली दिसत नाहीयेत. आगामी विश्वचषक आणि आशिया कपच्या दृष्टीने ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. या मालिकेत असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना आशिया चषकापूर्वी स्वत:ला सिद्ध करायचे आहे. प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळेल? त्याची कामगिरी ही टीम इंडियासाठी महत्त्वाची असेल. आशिया चषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची एकदिवसीय मालिका आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी टीम इंडियाच्या फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात विराट आणि रोहित दिसत नव्हते.
वेस्ट इंडिज संघ: शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), ॲलिक अथनाझ, यानिक कारिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशान थॉमस, डेनिस बुली, रोस्टन चेस, मॅकेनी क्लार्क, क्वाम हॉज, जैर मॅककॅलिस्टर, ओबेद मॅककॉय, केविन विकहॅम
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र यादव, कुलदीप यादव, जयदेव उनादकड, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
विंडीजमध्ये भारतीय संघाचे हाल
गुरुवारपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. यासाटी भारतीय संघ बार्बाडोस येथे पोहचली. मात्र या प्रवासादरम्यान भारतीय संघाचे चांगलेच हाल झाले. त्यांना त्रिनिदाद विमानतळावर जवळपास 6 तास विमानाची वाट पाहत बसावे लागले. भारतीय संघाची बार्बाडोससाठी रात्री 11 वाजताची फ्लाईट होती. मात्र हे 11 वाजताच्या विमानाने रात्री 3 वाजता उड्डान घेतले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय खेळाडू रात्री 8.40 ला विमानतळावर दाखल झाले. मात्र रात्री 3 वाजचा विमानाने उड्डाण घेतले. यानंतर भारतीय संघ पहाटे 5 वाजता बार्बाडोस येथे दाखल झाला. यामुळे खेळाडू खूप नाराज झाले होते. यावेळी त्यांनी बीसीसीआयकडे इथून पुढे विमान प्रवास सकाळी करण्याची विनंती केली. खेळाडू रात्री 8.40 ला हॉटेलमधून निघाले होते. त्यांना विमानतळावर खूपवेळ वाट पहावी लागली. संघ व्यवस्थापनाने आम्हाला रात्री उशिरा विमान प्रवास करण्याऐवजी सकाळच्या फ्लाईट बूक कराव्यात अशी विनंती केली आहे. खेळाडूंना विमान प्रवासानंतर काही काळ आरामाची गरज असते. बीसीसीआय याबाबत सहमत झाला असून पुढच्या वेळेपासून प्रवासाचे शेड्युल सकाळच्या वेळी ठेवण्यात येईल. वनडे संघातील सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे फक्त मर्यादित षटकांचे सामने खेळणारे खेळाडू यापूर्वीच बार्बाडोसमध्ये दाखल झाले आहेत.