। मुंबई । वृत्तसंस्था ।
जम्मू-काश्मीरमधील गुरेझच्या तुलईल भागात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरच्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी सुरक्षा दलांची शोध पथके बर्फाळ भागात पोहचली आहेत. याठिकाणी किती कर्मचारी जखमी झाले याबाबात अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समेर आल्याची माहिती संरक्षण अधिकारी यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझच्या तुलईल भागात आज दुपारी लष्कराचे हेलिकॉप्टर गुजरन नाल्यात कोसळले. यानंतर त्याठिकाणी तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.







