भारताच्या जोडीची ‌‘सुवर्ण’ नेमबाजी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताच्या पलक व मुकेश नेलावल्ली या जोडीने नेमबाजी विश्वकरंडकात विश्वविक्रमासह सुवर्णपदकावर मोहर उमटवली आहे. या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात चीनच्या हू केई-कियानशून या विश्वविजेत्या जोडीला पराभूत करताना सुवर्णपदकावर हक्क सांगितला. त्यामुळे चीनच्या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर, हंगेरीच्या वेरोनिका मेजर-ॲकोस कॅरोली नॅगी या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. तब्बल 42 देशांतील खेळाडू या प्रकारात सहभागी झाले होते. त्यामधून फक्त चारच देशांच्या जोड्यांना अंतिम फेरीमध्ये वाटचाल करता आली. त्यात भारत, चीन, हंगेरी व अमेरिका या 4 देशांच्या जोड्यांचा समावेश होता. यावेळी चीनच्या जोडीने 586 गुणांसह पहिले स्थान पटकावले. भारताच्या जोडीने 581 गुणांसह दुसरे स्थान मिळवले. तर, हंगेरीच्या जोडीने 580 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर पात्रता फेरीमध्ये दुसरे स्थान मिळवलेल्या पलक व मुकेश नेलावल्ली या जोडीने अंतिम फेरीमध्ये 487 गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. त्यामुळे भारतीय जोडीला सुवर्णपदकावर हक्क सांगता आला. आणि चीनच्या जोडीला 484 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Exit mobile version