विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; पाहा कुणाला मिळाली संधी?

तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांचा पत्ता कट

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आता एकदिवसीय वर्ल्डकप सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे, याआधी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाची धुरा रोहित शर्माकडे आहे. ही स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. आशिया कप मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर श्रीलंकेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची बैठक झाली, ज्यामध्ये वर्ल्ड कप खेळण्यासाठी 15 खेळाडूंना अंतिम रूप देण्यात आले.

विश्वचषकासाठी भारताचे 15 शिलेदार
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.


आशिया कप मध्ये भारतीय संघात स्थान मिळालेले प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा आणि राखीव खेळाडू म्हणून निवड झालेल्या संजू सॅमसनला संघात स्थान मिळणार नाही.

टीम इंडिया वर्ल्ड कप वेळापत्रक

08 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
02 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
05 नोव्हेंबर विरुद्ध द. आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू
Exit mobile version