| अलिबाग | प्रतिनिधी |
गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. या जयघोषाने सार्वजनिक बाप्पांसोबत घरगुती बाप्पा देखील विराजमान झाले आहेत. या निमित्ताने अलिबाग येथील एका गृहस्थांच्या निवासस्थानी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी आपली पत्नी रितिका हिच्यासोबत बाप्पाचे दर्शन घेतले. रोहित शर्मा अलिबागमध्ये आल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून फोटो काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती.