युवा खेळाडूंना मिळणार संधी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वेस्ट इंडिजनंतर भारताला यावर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. जिथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळल्या जाणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवार 14 जुलै रोजी भारत दौरा जाहीर केला आहे. 26 डिसेंबरपासून सेचुरियनमध्ये कसोटी मालिका सुरू होणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर या मालिकेत बीसीसीआयकडून युवा खेळाडूही पाहायला मिळतील. ही मालिका यावर्षी डिसेंबरमध्ये सुरू होईल आणि जानेवारी 2024 पर्यंत खेळली जाईल.
पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान केपटाऊन येथे होणार आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय येत्या काही दिवसांत 15 सदस्यीय संघाची घोषणा करू शकते. ज्यामध्य कमान अजिंक्य रहाणेकडे सोपवली जाऊ शकते. कारण यंदाचा विश्वचषक भारतात होणार आहे. ज्याचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे रोहित आणि विराटला सतत क्रिकेट खेळल्यामुळे विश्रांती दिली जाऊ शकते. यशस्वी जैस्वालनंतर सरफराज खानची या आफ्रिका दौऱ्यावर निवड होऊ शकते. तर गोलंदाजीत नवदीप सैनी, मुकेश कुमार यांची निवड होऊ शकते. संभाव्य खेळाडूचा संघ : शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, मुकेश कुमार, आर अश्विन.
दौऱ्याचे वेळापत्रक
टी 20 मालिका
पहिला टी 20 सामना, 10 डिसेंबर डर्बन, दुसरा टी 20 सामना 12 डिसेंबर गेकेबेरा (पोर्ट एलिझाबेथ),तिसरा टी 20 सामना 14 डिसेंबर 2023, जोहन्सबर्ग
एकदिवसीय- पहिला सामना, 17 डिसेंबर जोहान्सबर्ग,दुसरा सामना, 19 डिसेंबर 2023, गेकेबेरा (पोर्ट एलिझाबेथ),तिसरा सामना, 21 डिसेंबर,पार्ल
कसोटी मालिकाः पहिली कसोटी, 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर , सेंच्युरियन दुसरी कसोटी, 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024, केप टाऊन