विंडीज दौऱ्यात भारतीय संघाची गैरसोय

हार्दिक पांड्याकडून नाराजी

| त्रिनिदाद | वृत्तसंस्था |

विंडीज दौऱ्यावर टीम इंडियाला गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड (सीडब्ल्यू) वर नाराज आहे. तिसऱ्या वनडेनंतर हार्दिक पांड्याने ते उघडपणे व्यक्त केले. पायाभूत सुविधांच्या कमतरतेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आणि क्रिकेट वेस्ट इंडिजने या समस्येकडे लक्ष द्यावे आणि त्याचे निराकरण करावे असे सांगितले. ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, आम्ही खेळलेल्या सर्वोत्तम मैदानांपैकी हे एक आहे. पुढच्या वेळी वेस्ट इंडिजमध्ये येताना परिस्थिती अधिक चांगली होईल, अशी आशा आहे. प्रवास करण्यापासून ते इतर गोष्टी सांभाळण्यापर्यंत, गेल्या वर्षीही काही अडचणी आल्या होत्या. मला वाटते की, वेस्ट इंडिज क्रिकेटने कोणत्याही संघाच्या दौऱ्यावर याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. आलिशान सुविधा नकोत, किमान मूलभूत सुविधा तरी दिल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त येथे क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला.

विमानाला झाला होता उशीर
भारतीय क्रिकेटपटूंनी उड्डाणाच्या विलंबावर बीसीसीआयकडे नाराजी व्यक्त केली होती. त्रिनिदाद ते बार्बाडोस येथे रात्री उशिरा जाण़़ाऱ्या विमानाला जवळपास चार तास उशीर झाला होता, ज्यामुळे एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी त्यांना पुरेशी झोप घेता आली नाही. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर संघाने पाच विकेट्स गमावून 351 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

Exit mobile version