। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टोकियो ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केल्यानंतर आता भारताला पुढील महिन्यात होणार्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदकतालिकेत दुहेरी संख्या मिळवण्याची आशा आहे.
यासाठी अनेक भारतीय खेळाडू परदेशात ट्रेनिंग कॅम्पमध्ये मेहनत घेत आहेत. सरकारने या खेळाडूंसाठी पॅरिसमध्ये पूर्ण तयारी करण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. ऑलिम्पिक सेल, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमच्या माध्यमातून खेळाडूंना सर्वोत्तम परदेशी अनुभव देण्यासाठी 17.90 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे 92 खेळाडू मैदानात उतरणार आहेत. यात स्टार आणि गोल्डन बॉय नीरज चोप्राचा समावेश आहे.
कोणत्या खेळाडूवर किती खर्च झाला- नीरज चोप्रा (द.आफ्रिका, फिनलँड, जर्मनी आणि तुर्की) 176 दिवसात 48.76 लाख खर्च, ट्रॅक रेकॉर्ड-2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक, 2022 मध्ये वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पीव्ही सिंधू (जर्मनी)- 36 दिवस- 26.60 लाख खर्च, ट्रॅक रेकॉर्ड, ऑलिम्पिक आणि सर्किटमध्ये पदक, 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य, 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण, 2013 मध्ये अर्जुन पुरस्कार मीराबाई चानू (सेंट सुईस अमेरिका) 65 दिवस 42.54 लाख खर्च, रोहन बोपन्ना (अमेरिका, मोनाको, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन) 181 दिवस 1.03 कोटी, ट्रॅक रेकॉर्ड-दोन ग्रॅड स्लॅम विजेतेपद,2012 आणि 2016 ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, निशद कुमार, मरियप्पन थंगावेलू (चुला विस्ता, अमेरिका)- 75 दिवस- 39.83 लाख खर्च केला आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णपदकासह एकूण 7 पदके जिंकली होती. आता यावेळी हा विक्रम मोडण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पॅरिसमध्ये सर्व भारतीयांची नजर असेल ती भालाफेकपटू नीरज चोप्रावर. निरजने नुकत्याच झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. अर्थात नीरज 90 मीटरचा थ्रो करू शकला नाही. दुसर्या प्रयत्नात त्याने 85.97 मीटरचा थ्रो फेकला होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या खेळाडूंकडून आशा नीरज चोप्रा- भालाफेक अदिती अशोक- गोल्फ सात्विक साईराज, रंकीरेड्डी चिराग शेट्टी- बॅडमिंटन निखत जरीन- बॉक्सिंग पीव्ही सिंधू- बॅडमिंटन लव्हलीना बोरगोहेन- बॉक्सिंग पुरुष हॉकी टीम.