| पॅरिस | वृत्तसंस्था |
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या चांगल्या कामगिरीत सातत्य ठेवले आहे. दरम्यान आता कपिल परमारने 1 60 किलो पॅरा ज्युदो स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकले. गुरुवारी (दि.5) रोजी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत कपिलने ब्राझीलच्या एलिटन डी ऑलिव्हेराचा एकतर्फी 10-0 असा पराभव केला. पॅरालिम्पिकच्या इतिहासात ज्युदोमध्ये भारताचे हे पहिले पदक ठरले.
दृष्टीदोष असलेले किंवा कमी दृष्टी असलेले खेळाडू पॅरा ज्युडोमध्ये 1 प्रकारात भाग घेतात. कपिलच्या कांस्यपदकासह पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 12 कांस्य पदके जिंकली आहेत. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत परमारने याच प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. कपिल परमारने उपांत्यपूर्व फेरीत व्हेनेझुएलाच्या मार्को डेनिस ब्लँकोचा 10-0 असा पराभव केला होता. मात्र उपांत्य फेरीत त्याला इराणच्या एस. बनिताबा खोर्रम आबादीचा 0-10 असा पराभव केला. या दोन्ही सामन्यात परमारला प्रत्येकी एक पिवळे कार्ड मिळाले. उपांत्य फेरीतील पराभवाने परमारचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न निश्चितच भंगले. पण आता त्याने कांस्यपदक जिंकून नवा इतिहास रचला. दुसरीकडे महिलांच्या 48 किलो 2 गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या कोकिलाला कझाकिस्तानच्या अकमारल नौटबेकविरुद्ध 0-10 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर रेपेचेज-ए च्या 2 फायनलमध्ये कोकिला युक्रेनच्या युलिया इव्हानित्स्काकडून 0-10 ने हरली. यामध्ये तिला तीन पिवळे कार्ड मिळाले तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला दोन पिवळे कार्ड मिळाले. ज्युडोमध्ये किरकोळ उल्लंघनासाठी पिवळे कार्ड दिले जाते. आंशिक दृष्टी असलेले खेळाडू 2 प्रकारात भाग घेतात.