आस्ट्रेलियाला 4-1ने चारली धूळ
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रविवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया सहा धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने 20 षटकांत आठ विकेट गमावत 160 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 154 धावा करता आल्या.
श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीनंतर रवी बिश्नोई, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारताने 160 धावांचा यशस्वी बचाव केला आणि हा सामना जिंकला. शेवटच्या षटकांत अर्शदीप सिंगने अप्रतिम मारा करून ऑसींच्या तोंडचा घास पळवला. शेवटच्या षटकात विजयासाठी 10 धावा हव्या असताना अर्शदीपने केवळ 3 धावा दिल्या आणि मॅथ्यू वेडची विकेट घेऊन मॅच फिरवली. श्रेयस अय्यरच्या फिफ्टीच्या जोराव तगडे आव्हान उभे करता आले. श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकांत जोरदार फटकेबाजी केली. यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा आणि अक्षर पटेल यांनी उपयुक्त खेळी केली. यशस्वी जैस्वाल (21 आणि ऋतुराज गायकवाड (10) यांना आज मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव ( 5) व रिंकू सिंग (6) हेही आज फेल केले. जितेश शर्मा (24) व श्रेयस अय्यर यांनी 24 चेंडूंत 42 धावांची भागीदारी केली, परंतु आरोन हार्डीने ही सेट जोडी तोडली. अक्षर पटेलने (31) श्रेयसला उत्तम साथ दिली आणि 46 धावा जोडल्या. श्रेयसने 37 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या. भारताने 20 षटकांत 8 बाद 160 धावा उभ्या केल्या.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 154 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक 54 धावा केल्या, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. ट्रॅव्हिस हेडने 28 आणि मॅथ्यू वेडने 22 धावा केल्या. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही. टीम डेव्हिड 17 धावा करून बाद झाला, तर मॅथ्यू शॉर्ट 16 धावा करून बाद झाला. ॲरॉन हार्डीला सहा आणि जोश फिलिपला चार धावांवर बाद झाला. भारताकडून मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करताना सर्वाधिक तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.6 चेंडूंत 10 धावा ऑसींना हव्या होत्या. त्यात अर्शदीपने पहिलाच चेंडू बाऊन्सर टाकला, मॅथ्यू वेड वाईडसाठी मागणी करताना दिसला. अर्शदीपने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकली. तिसऱ्या चेंडूवर वेड (22) झेलबाद झाला. पाचव्या चेंडूवर अम्पायर जखमी होता होता थोडक्यात वाचले. ऑस्ट्रेलियाला 8 बाद 154 धावाच करता आल्या आणि भारताने 6 धावांनी सामना जिंकला.
