टेबल टेनिसमध्ये भारताला पहिलं कांस्य

सुतिर्था अन्‌‍ अयहिका मुखर्जीची ऐतिहासिक कामगिरी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताच्या सुतिर्था आणि अयहिका मुखर्जीने भारताला टेबल टेनिस महिला दुहेरीमध्ये कांस्यपदक जिंकून दिले. या दोघींनी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरी टेबल टेनिसमध्ये पहिल्यांदाच भारताला पदक मिळवून देण्याचा इतिहास रचला.

उपउपांत्य फेरीत त्यांनी यजमान चीनचा पराभव केल्यानंतर उपांत्य फेरीत सुतिर्था आणि अयहिका यांना उत्तर कोरियाच्या खेळाडूंकडून पराभव सहन करावा लागला. उत्तर कोरियाच्या सुयाँग चा आणि युगयाँग पाक यांनी सात गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात पराभव केला.

Exit mobile version