तिसर्‍या मात्रेचे संकेत

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनसाठी आता भारतात देखील लसींच्या दोन्ही मात्रांनंतर तिसरी मात्रा देण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असून, हा निर्णय घेतला जाणार आहे.
देशातील लसीच्या तिसर्‍या मात्रेसंदर्भात धोरणात्मक दस्तऐवज तयार करण्यासाठी तज्ञ गट काम करीत आहे. तिसर्‍या लसीच्या मात्रेची सुरुवातीला बूस्टर मात्रेऐवजी अतिरिक्त मात्रा म्हणून शिफारस करण्यात येणार आहे.
कोरोना लसीचे बूस्टर शॉट्स देण्याची प्रक्रिया अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे, तर अजूनही अनेक देशांमध्ये यावर विचार केला जात आहे. भारतातील कोरोना लसीच्या तिसर्‍या डोसबाबत प्रशासन धोरण ठरवू शकते. भारतात, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना अतिरिक्त शॉट म्हणून कोरोनाचा तिसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version