इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू उपांत्य फेरीत

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बी. साईप्रणीतला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत तिसर्‍या मानांकित सिंधूला विजयासाठी एक तास आणि सहा मिनिटे संघर्ष करावा लागला. पहिला गेम गमावूनही सिंधूने दक्षिण कोरियाच्या सिम यू जी हिच्यावर 14-21, 21-19, 21-14 अशी मात केली. उपांत्य फेरीर्त ंसधूसमोर थायलंडच्या दुसर्‍या मानांकित रॅटचॅनोक इन्टानॉनचे कडवे आव्हान असेल. इन्टानॉनने अग्रमानांकित अकाने यामागुचीला धूळ चारली.

Exit mobile version