| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील खांब येथे राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त कोय कलमाबद्दल माहितीपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त कृषी महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थाच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ‘कृषी संजीवनी’ गटाने खांब या गावात कोय कलमाबद्दल माहिती दिली व त्या पद्धतीने कलम कशाप्रकारे बांधून घ्यावे हे त्यांना प्रात्यक्षिकरित्या दाखवले. या सोबतच आंब्याच्या झाडांची लागवण कशी करावी, आंब्याच्या झाडासाठी कोणती खते वापरावी, आंब्याच्या विविध जाती व त्यांचे महत्व यासंदर्भात सविस्तर माहिती कृषिदुतांतर्फे शेतकऱ्यांना देण्यात आली.
या प्रात्यक्षिक कार्यक्रमसाठी केव्हिके रोहाचे अध्यक्ष डॉ. मनोज तलाठी आणि डॉ. जीवन अरेकर, कृषी महाविद्यालायचे डॉ. महेश कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.