। आगरदांडा । प्रतिनिधी ।
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि इन्फोसिस कंपनी यांच्या विद्यमाने सुरू केलेल्या स्प्रिंग बोर्ड प्रकल्पाची सुरुवात वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय मुरुड जंजिरा येथे करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य डॉ.विश्वास चव्हाण, डॉ.श्रीशैल बहिरगुंडे, डॉ.मधुकर वेदपाठक, डॉ.जनार्धन कांबळे आदिंसह प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.उपपाचार्य विश्वास चव्हाण म्हणाले की विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शिक्षणाबरोबरच कौशल्य आधारित शिक्षण, तांत्रिक शिक्षण, रोजगाराभिमुख शिक्षण यासाठी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी कार्यशाळा आयोजित केली. 150 विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रकल्पात नोंदणी केली. या प्रकल्पात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे. विद्यार्थ्यांना औपचारिक अभ्यासक्रम ऑनलाईन मंचावर उपलब्ध आहे. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड लिंक वर कौशल्याधारित, रोजगाराभिमुख, उद्योगांच्या गरजेनुसार 3800 च्यावर कोर्सेस विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहेत. कार्यक्रमास डॉ. जनार्धन कांबळे, डॉ. श्रीशैल्य भैरगुंडे उपस्थित होते.