| आगरदांडा । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क मुरुड-पद्मदुर्ग कार्यालयाच्या उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जागन पुलेकर, जितेंद्र पाटील,महेंद्र शेडगे, जागन पुलेकर, प्रवेश पालशेतकर, युवराज भगत, निलेश पुलेकर, अरविंद गायकर, मनिष गोंजी, आकाश खोत, राहुल गोसावी, ओंकार दर्ग, अंकित गुरव, अर्थव खोत, विघ्नेश जगताप, मनिष शामा आदिंसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते. अमित ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.मुरुड बाजार पेठ पासुन ढोलताशांच्या गजरात कार्यालया पर्यंत पायी रॅली काढण्यात आली. या रॅलीत तालुक्यातील अनेक युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.