साहित्य संमेलनात गिरिश कुबेरांवर शाईफेक

। नाशिक । प्रतिनिधी ।

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्रफ या पुस्तकावरून गेले कित्येक दिवास वाद सुरू आहे. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा आक्रमक सवाल संभाजी बिग्रेडसह अनेक संघटनांनी उपस्थित केला होता. तसेच या संघटानांनी कुबेर यांच्या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्याची जोरदार मागणी केली होती. याच पार्श्‍वभुमीवर नाशिक येथे होत असलेल्या साहित्य संमेलनात काही कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील वातावरण चिघळले होते. शाई फेकणार्‍यांचा शोध सध्या सुरु आहे.

भाजपचे अप्रत्यक्ष समर्थन
संपादकपदी काम करीत असताना भान ठेवणं गरजेचे आहे. लिखाणाचा परिणाम समाजावर होत असतो. आक्षेपार्ह लिखाण असेल संघटनाने केलेला विरोध योग्य आहे. अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी व्यक्त करीत झालेल्या घटनेचे अप्रत्यक्ष समर्थन केले असल्याचे दिसून आले आहे.

शाईफेक घटनेचा निषेध – संजय राऊत
ज्येष्ठ पत्रकार गिरिश कुबेर यांनी पुस्तकारच्या माध्यमातून केलेल्या लिखाणावर आक्षेप आहेच. मात्र अशा पद्धतीने अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शाईफेक करणे चुकिचे आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध करतो.

Exit mobile version