| माणगांव | प्रतिनिधी |
इनोव्हा गाडीची 15 वर्षीय शाळेच्या विद्यार्थ्यास ठोकर लागून अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरत धोंडिबा काळे हे माध्यमिक विद्यामंदिर रातवड या शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन वनराई बंधारा बांधणे या उपक्रमाकरिता भुवन या गावात घेऊन गेले होते. उपक्रम संपल्यावर शिक्षकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले. विद्यार्थी अल्पेश अनिल जाधव (वय 15, रा. वावे दिवाळी ) हा भुवन स्टॉप येथे महामार्ग ओलांडून जात असताना वेगाने आलेल्या इनोव्हाची धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. या अपघात प्रकरणी इनोव्हा चालक अझमतुल्ला अलिमिया पालवकर याच्या विरोधात माणगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
इनोव्हाची विद्यार्थ्यास ठोकर
