दोन जखमी ; पोयनाड येथील घटना
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरातील बैकर बेकरी जवळ भरधाव इनोव्हा कारने चुकीच्या बाजूने समोरून ठोकर मारली. या अपघातात दुचाकी स्वारासह मागे बसलेली त्याची आई जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजी सांयकाळी 6:45 च्या सुमारास मोठे शहापुर पो कामार्ले, अलिबाग येथील फिर्यादी यांचा पुतण्या प्रशांत वय-40 रा,केतकीचा मळा ता.अलिबाग हा त्याच्या होंडा शाईन दुचाकीवर आई वय-60 रा.केतकीचा मळा ता.अलिबाग हीच्या सोबत पोयनाड ते केतकीचामळा असा पोयनाड ते अलिबाग रोडने जात होता. पोयनाड अलिबाग रोडवरील बैकर पेपरमिल समोरील मोरीच्या पुढे ते आले असता अलिबाग बाजूकडून पोयनाड बाजूकडे येणारी सफेद रंगाची इनोव्हा कार चालकाने भरधाव वेगात चुकीच्या बाजूने दुचाकीला समोरून ठोकर मारली. सदर अपघातामध्ये मोटार सायकलस्वार व त्याचे पाठीमागे बसलेली त्याची आई दोघांनाही लहान मोठया व गंभीर स्वरूपाच्या दुखापतीस व दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
याबाबत पोयनाड पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क 279,337,338, मोटार वाहन अधिनियम,1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार श्री.माने हे करीत आहेत.