महिलावर्गामध्ये संताप
। पाताळगंगा । वार्ताहर ।
लहान मुले कुपोषित राहू नये त्यासाठी त्यांस पोषण आहार देण्यात येत असतो. पोषण आहारामुळे मुलांमध्ये चांगली वाढ व्हावी या दृष्टीकोनातून आहार गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. मात्र खालापूर तालुक्यातील असलेल्या आंबिवली गावातील महिला वर्ग पोषण आहार घरी घेवून आल्यानंतर ते पॉकीट फोडल्यानंतर त्या कडधान्यामध्ये किडे असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महिला वर्गामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
मुलांसाठी येत असलेल्या पोषण आहार हे पाकिट सील बंद स्वरूपात असल्यामुळे ते खराब असेल याची जाणीव नसते. मात्र आलेले पोषण आहार मुळातच निकृष्ट दर्जाचे आल्यामुळे महिला वर्गामध्ये नारजीचा सूर उमटत आहे. तसेच सदर पोषण आहारांची तपासणी करुनच मुलांसाठी देण्यात यावे असे तिथे जमलेल्या महिला वर्गांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
लहान मुलांचा पोषण आहार हा फुड कॉरपरेशन इंडीया यांच्या माध्यमातून डायरेक्ट येत असतो. सदर काही पोषण आहारामध्ये किडे किंवा आळ्या असतील तर ते बदलून नविन देण्यात येइल.
चेतन गायकवाड, बाळ विकास प्रकल्प अधिकारी.