सातार्‍यातील पदाधिकार्‍यांचा श्रीनिवास पाटलांसाठी आग्रह

| सातारा | वृत्तसंस्था |

शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सर्वात सुरक्षित असलेल्या मतदारसंघ म्हणजे सातारा. श्रीनिवास पाटलांनी वयाचं कारण सांगितल्यानंतर ही जागा काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण लढवण्याची चर्चा असताना आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच लढवणार आहे. वयाच्या 83 व्या वर्षी जर शरद पवार लढत असतील तर श्रीनिवास पाटीलांनीही त्यांना साथ द्यावी, उदयनराजेंना श्रीनिवास पाटीलच चांगली साथ देऊ शकतील अशी भूमिका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीनिवास पाटील यांनाच निवडणूक लढण्यासाठी आग्रह करण्यात येतोय. महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात श्रीनिवास पाटील हेच चांगला लढा देऊ शकतील अशी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवार आक्रमकपणे लढा देत असताना श्रीनिवास पाटील यांनी देखील मित्र म्हणून लढाईत शरद पवारांना साथ देण्याची पक्षातील एका गटाची भूमिका आहे.

सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातून तब्येतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढणार नसल्याची भूमिका श्रीनिवास पाटील यांनी मांडली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचे पुत्र सारंग पाटील यांचे नाव पुढे केलं होतं. सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यानंतर शशिकांत शिंदे, सुनील माने आणि बाळासाहेब पाटील यांच्या नावांची चर्चा होती. सातारा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी असलं तरी त्या ठिकाणी उदयनराजेंच उमेदवार असतील असं सांगण्यात येतंय. गेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला होता. यावेळी तब्येतीचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी आपण लढणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सातार्‍यातील उमेदवारीसाठी गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने बैठका सुरू आहेत. शरद पवारांनीही या मतदारसंघाचा आढावा घेतला आहे.

Exit mobile version