। उरण । वार्ताहर ।
1930 च्या चिरनेर जंगल सत्याग्रह स्मारकाची जेएनपीए अधिकार्यांनी गुरुवार, दि. 28 जुलै रोजी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चिरनेर येथील हुतात्मा स्मारकाची दुरवस्था झाली आहे. या स्मारकाची दुरुस्ती जेएनपीएने करावी, अशी मागणी जेएनपीए ट्रस्टी भूषण पाटील यांनी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्याकडे केली होती. त्यानुसार जेएनपीएच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ट्रस्टी भूषण पाटील, चीफ मॅनेजर जयवंत ढवळे, मॅनेजर लाघवनकर, जी.बी. मोरे आदी उपस्थित होते.
चिरनेर हुतात्मा स्मारकांची पाहणी
