| पनवेल | प्रतिनिधी |
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 26 फेब्रुवारी रोजी पनवेल येथील पोयंजे ग्रामपंचायत येथील कातकरी आदिवासी वाडी येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान पीएम जनमन अंतर्गत झालेल्या घरकुलांची पाहणी केली.
यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांनी कातकरी वाडीतील सर्व सुविधांची बारकाईने पाहणी केली. यामध्ये घरकुलांचे आतील चटई क्षेत्र त्याचप्रमाणे दारे खिडक्या, यामध्ये शौचालयाला जोडलेला शोषखड्डा त्याचप्रमाणे वाडीला मिळणारे रोजचे पाणी याचा स्तोत्र तसेच वापराव्यात आणावयाच्या पाण्याचा स्तोत्र याचीसुद्धा पाहणी केली. त्याचप्रमाणे वाडीतील सर्व लहान मुले, आबालवृद्ध व महिलावर्ग यांच्याशी रोजगाराविषयी चर्चा केली. यामध्ये कायमस्वरूपी रोजगार कसा निर्माण होईल याचीही चर्चा केली. या दौर्यामध्ये तेजस्वी गलांडे प्रकल्प संचालक पेण आदिवासी विभाग, माजी सरपंच जगदीश मते, ग्रामपंचायत अधिकारी धनंजय निकम उपस्थित होते. दौर्यामध्ये जावळे यांनी बर्याच बारीक-सारीक गोष्टींची नोंद घ्यावयास लावली. तसेच, पोयंजे कातकरी वाडी ही पीएम जनमनमधील आदर्शवाडी करावी, अशा सूचना दिल्या.