सिडको आणि जेएनपीएकडून रांजणपाडा गावाची पाहणी

| उरण | वार्ताहर |
दास्तान फाटा येथे सुरू असलेल्या भरावामुळे रांजणपाडा गावात पावसाळी पाणी येऊन घरांत घुसण्याची शक्यता होती. त्याविरोधात शेकापचे युवानेते रमाकांत म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. जेएनपीए प्रशासनाने याची दखल घेतल्याने उपोषण स्थगित केले मंगळवारी ( 14 फेब्रुवारी ) जेएनपीएचे अधिकारी वर्गानी घटनास्थळी येऊन पहाणी केली. त्यावेळी यातून लवकरच मार्ग काढण्याचे आश्‍वासन रांजणपाडा ग्रामस्थांना दिले.

दास्तान फाटा ते रांजणपाडा यादरम्यान जेएनपीटी 12.5% भरावाचे दुसर्या टप्प्यातील काम चालू आहे. 4-5 वर्षापूर्वी झालेल्या पहिल्या मुरूमाच्या माती भरावामुळे पावसाळ्यात रांजणपाडा गावातील 109 घरे पाण्याखाली गेली होती. नुकसानभरपाई मिळावी म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका युवक अध्यक्ष श्री रमाकांत म्हात्रे यांनी जेएनपीटी समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते याची दखल घेऊन जेएनपीटीने पाण्याचा निचरा होण्यासाठी एक तात्पुरता नाला खोदून तहसीलदार उरण यांजकडून प्रत्येकी 10 हजार रुपये नुकसानभरपाई दिली होती. आता दुसर्‍या टप्प्यात माती भरावाचे काम असून या पावसाळ्यात संपूर्ण रांजणपाडा गावच पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेएनपीटीने सिडको मार्फत येत्या 3-4 महीन्यात उपाययोजना करून रांजणपाडा गाव पावसाळ्यात पाण्याखाली जाण्यापासून वाचवावे म्हणून रमाकांत म्हात्रे यांनी 4 जानेवारी रोजी जेएनपीटी व सिडकोला या संदर्भात पत्र देऊन उपाययोजना करण्या संदर्भात बैठक लावण्याची मागणी केली होती अन्यथा जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत सिडको अधिकार्‍यांनी 17 जानेवारी रोजी एक पाहणी दौरा केला होता.

त्यानंतर जेएनपीए अधिकारी व सिडको अधिकारी यांनी संयुक्त दौरा करून येत्या 10-15 दिवसांत आराखडा बनवून लवकरच टेंडर काढण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी पंचायत समितीचे मा. सभापती नरेशशेठ घरत, शेकापचे रमाकांत ग्राम पंचायत सदस्य तेजस पाटील, एकनाथ घरत. सुदर्शन पाटील, राजेश ठाकुर, विजय नाईक, नवनीत नाईक तर जेएनपीटी तर्फे राजेश म्हात्रे तर सिडको तर्फे मोहन मुंडे व त्यांचा अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Exit mobile version