| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा एसटी विभागीय नियंत्रक श्री.घोडे यांनी नुकतीच श्रीवर्धन आगाराला भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी रा.प.महामंडळाच्या रायगड विभागाचे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या कोकण प्रादेशिक विभागाचे उपाध्यक्ष आनंद जोशी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी रत्नागिरीसाठी श्रीवर्धन-दापोली-खेड ही बस पुन्हा सुरु करावी, श्रीवर्धन-गोरेगाव दापोली-खेड-रत्नागिरी अशी बस कायमस्वरुपी सुरु करण्यात यावी ,श्रीवर्धन-अक्कलकोट बस नव्याने सुरु व्हावी.श्रीवर्धन-पुणे मार्गावर सकाळची बस तरी विठाई बस द्यावी.तसेच तळा वस्तीची गाडी येतांना तळा-इंदापूर-माणगाव या मार्गाने श्रीवर्धनला येत असे.ती गाडी श्रीवर्धनकडे येणार्या नोकरदार वर्गासाठी पहिली गाडी म्हणून फार सोयीची होती.ती सध्या बंद आहे.ती पुनरपि सुरु करण्यात यावी अशीही विनंती जोशी यांनी केली.
हत्वाचे म्हणजे गर्दीचे वेळी ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.च्या आरक्षणासाठी स्थानकावर दीर्घकाळ रांगेत उभे रहाणे शक्य नसते.त्याकरिता गर्दीचे सिझनला रिझर्वेशन खिडकीवर एक ऐवजी दोन कंट्रोलर्स असावेत म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागणार नाही अशीही विनंती करण्यात आली. त्याची त्वरित दखल घेऊन तशा लेखी सूचना रायगडमधील सर्वच आगारांना काढण्याचे आदेश .घोडे यांनी त्वरित पेण येथील त्यांच्या कार्यालयाला दिले. या भेटीचे वेळी श्रीवर्धनचे आगार व्यवस्थापक तेजस गायकवाडही उपस्थित होते.