क्रांतिसिंह ‘सेझ’च्या लढ्याचे प्ररेणास्त्रोत : धैर्यशील पाटील

विटा | प्रतिनिधी |

‘सेझ’च्या माध्यमातून रिलायन्स ने तेरा हजार एकर जमीन मुठीत घेण्याचा डाव होता. तो लढा उधळून लावण्याचे काम कोकणातील शेतकऱ्यांनी केले. सेझ विरोधी तीन वर्ष लढा दिला. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या लढ्याला यश आले , सेझ विरोधी लढ्याचे प्ररेणास्त्रोत क्रांतिसिंह नाना पाटील होत असे प्रतिपादन माजी आमदार धैर्यशील पाटील ( पेण ) यांनी केले.
हणमंतवडिये ( ता. कडेगांव ) येथील हनुमान मंदीरात क्रांतिसिंह विश्वस्त मंडळाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतीदिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शेतकरी सुतगिरणीचे अध्यक्ष नानासाहेब लिगाडे ( सांगोला ) उपस्थित होते. यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख , बी‌ .बी. लगारे , संपतराव पवार प्रमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्योत्तर चळवळीत दिलेले योगदान अमुल्य आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचे राज्य आहे. असे आपण सतत म्हणत असतो. पुरोगामी विचारांचा पाया क्रांतिसिंह नाना पाटील व बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला.
प्रा‌. लिगाडे म्हणाले , सामाजिक विषमतेला तिलांजली देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा जागर करणे आवश्यक आहे.
यावेळी डॉ. देशमुख यांची पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्षपदी व प्रा. विकास माने यांनी पीएच.डी. संपादन केली . त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ‘ बळवंत ‘ चे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे , धनाजी गुरव , बी. जे . पाटील , सुभाष पवार, आत्माराम मोरे , बी.एन. मोरे, पांडुरंग शितोळे, रघुराज मेटकरी , सुनिल गुरव ,समीर देसाई, देवकुमार दुपटे , विलासराव पाटील , भाई शरद पाटील , प्रा‌. विश्वनाथ गायकवाड , पद्माकर यादव , क्रांतिसिंह दूध संघाचे अध्यक्ष जयराम मोरे , विनोद लगारे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. अॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उत्कर्ष पाटील यांनी केले. इंद्रजीत पाटील यांनी आभार मानले.

Exit mobile version