अलिबाग | वार्ताहर |
वडखळ राष्ट्रीय महामार्गावर कार्लेखिंड येथे बसस्थानक आहे. या स्थानकाच्या दक्षिणेकडे आरसीएफ थळकडे एक फाटा जातो, तर हाशिवरेमार्गे रेवस बंदराकडे दुसरा फाटा जातो. त्यामुळे येथे वाहनांची सतत वर्दळ असते. त्यात जड वाहनांचाही समावेश असतो. म्हणून येथे अपघात होतात. वाहन चालकही भयग्रस्त असतात. ही भयग्रस्तता नष्ट होण्यासाठी येथे गतिरोधकाची आवश्यकता आहे. तर, अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित विभागाने याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी पत्रकार बळवंत वालेकर यांनी केली आहे.