| माणगाव | वार्ताहर |
जिल्ह्यातील 350 स्थानिक लोककलाकारांना विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्धार स्व. शाहीर पांडुरंग अधिकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला असून या योजनेचा शुभारंभ बुधवार (दि.3) रोजी शा. पांडुरंग अधिकारी यांच्या 10 व्या पुण्यतिथी निमत्त आयोजित कार्यक्रमात पेणतर्फे तळे येथे करण्यात आले.
शाहीर पांडुरंग अधिकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच जिल्ह्यातील स्थानिक लोक कलाकारांना विमा सुरक्षा पॉलिसी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या नुसार जाखडी नृत्याची परंपरा जपणार्या स्थानिक कलाकारांना सुरुवातीला विमा सुरक्षा पॉलिसी देण्यात आला. अपघात व अन्य कोणत्याही आजार व मृत्यू झाल्यास या पॉलिसीच्या माध्यमातून एक लाख रुपयांचा विमा सुरक्षा मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवराम पोटले, पोपट पोटले, सदानंद अधिकारी, भागोजी पोटले, गजानन अधिकारी, दगडू पाखड, सीताराम पोटले, बाबुराव भागडे, विजय पेणकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यानंद अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित शेडगे यांनी केले.