पनवेलमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

। पनवेल । वार्ताहर ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दाउदी बोहरा जमाते पनवेल, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन, इनर व्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन आणि रोटरॅक्ट क्लब पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही.के. हायस्कूल पनवेल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची माझे आवडते स्वातंत्र्य सैनिक या विषयावर आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

हा कार्यक्रम मुर्तुझा भाई साहब हसानी दाउदी बोहरा जमाते पनवेल यांच्या अध्यक्षतेखाली व माजी अध्यक्ष विष्णू म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन दाउदी बोहरा जमात पनवेल चे सचिव अली असगर गोलवाला व रोटरीयन अलीभाई सयफोद्दिन व्होरा यांनी केले.माजी अध्यक्ष प्रकाश शृंगारपुरे, अशोक गोवारीकर, अ‍ॅड दिपाली बोहरा यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पहिले.

वक्तृत्व स्पर्धेचे रु 5000 चे प्रथम बक्षीस समृद्धी जाधव, रु 3500 चे द्वितीय बक्षीस शिवप्रसाद साखरे, रु 2500 चे तृतीय बक्षीस आंचल गीते व रु 1000 चे उत्तेजनार्थ बक्षीसकरिष्मा राजपूत आणि हर्षाली मुकादम यांना प्रशस्ती पत्रासह देण्यात आले. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन चे अध्यक्ष कल्पेश परमार, सचिव हितेश राजपूत, इनर व्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन च्या अध्यक्षा कल्पना नागावकर, सई पालवणकर, सोनाली परमार व इतर रोटेरियन हजर होते.

Exit mobile version