आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा

Representational image. IANS

। नागोठणे । वार्ताहर ।
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या कोकण विभागीय झोन चारच्या आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात 6 ते 8 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या विभाग चारमधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 25 महाविद्यालयातील एकूण 300 विद्यार्थी व संघ व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

भारतीय हॉलीबॉल महासंघाच्या नियमानुसार सदर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पनवेल येथील पिल्लाई आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला. तर दुसरा क्रमांक सावंतवाडी येथील एस पी के महाविद्यालयास मिळाला. हे दोन्ही संघ इंटरझोनल स्पर्धेसाठी पात्र ठरले. तसेच तिसरा क्रमांक रत्नागिरी येथील हेग शेट्टी महाविद्यालयास मिळाला. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदेश गुरव, रिलायन्स इंडस्ट्रीजचे पठाण, चंद्रकांत नाईक यांच्या हस्ते विजेत्या गौरविण्यात आले.

या स्पर्धेला कोएसोचे अध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह अ‍ॅड. सिद्धार्थ संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, अधिकारी अशोक गावडे, सुरेंद्र दातार, नरेंद्रश जैन, अनिल काळे, अब्बास नागोठणावाला, अ‍ॅड. सोनल जैन उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विलास जाधवर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.श्रीकिशन तुपारे यांनी केले.

Exit mobile version