प्रितम म्हात्रेंना इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड

| पनवेल | वार्ताहर |

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवार (दि. 7) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. म्हात्रे यांना प्रतिष्ठेच्याआंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version