| माणगांव | प्रतिनिधी |
माणगांव येथील जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य हर्षल जोशी यांना नुकताच न्यु दिल्ली येथील इंटरनॅशनल इन्स्टीटयुट ऑफ एज्युकेशन अँन्ड मॅनेजमेंट या संस्थेने आशिया पॅसिफिक एज्युकेशन एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय सचिव एच. एस. रावत यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी डॉ. कमल जैन सेठीया, डॉ. गौरव गुप्ता, डॉ. मेघा वर्मा व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब सावंत, सचिव नानासाहेब सावंत, भाऊसाहेब सावंत, व महाविद्यालय विकास समिती सदस्य रामदास पुराणिक तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.