नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जागतिक पुरवठा साखळी सुधारली जात असून भारतातील सर्व गुंतवणूकदार आणि उद्योग भागधारकांसाठी संधी खुल्या असल्याचे सांगितले. भागधारकांना जागतिक पुरवठा साखळी आणि भारताच्या पारदर्शक नेतृत्वामुळे गुंतवणुकीसाठी प्रचंड संधी आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुचित केले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उद्योग संघटना फिक्की आणि यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक फोरमद्वारे आयोजित गोलमेज परिषदेत जागतिक उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना संबोधित केले.
अर्थमंत्री सीतारमण सध्या जागतिक नाणेनिधी संघ आणि जागतिक बँकेने बोलवलेल्या परिषदेसाठी अमेरेकत आहेत. यावेळी त्यांनी वॉशिंग्टन डीसीला भेट दिल्यानंतर सीतारामन न्यूयॉर्कमध्ये आल्या. वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांनी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकांमध्ये सहभाग घेतला.
स्टार्टअप कंपन्या भारतात खूप वेगाने वाढल्या आहेत. त्यापैकी अनेक भांडवली बाजारातून निधी उभारत आहेत. यावर्षी फक्त 16 स्टार्टअप्स युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले आहेत. युनिकॉर्न म्हणजे एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकनाला महत्व देणे, असे अर्थमंत्री म्हणाल्या. भारताने आव्हानात्मक काळातही डिजिटलायझेशनचा पुरेपूर फायदा घेतल्याची माहिती त्यांनी दिली.