जलमापक चोरीत बालकांचा सहभाग

भंगार व्यावसायिकाला ताब्यात

| पनवेल | वार्ताहर |

कळंबोली वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात जलमापकांची चोरी होण्याचे सत्र सूरु होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर कळंबोली पोलीस ठाण्याने दोन अंमलदारांची खास चोर पकडण्यासाठी नेमणूक केली होती. पोलीसांच्या तपासात बालकांच्या एका गटाने खाऊच्या पैशांसाठी ही चोरी केल्याचे उघड झाले. कळंबोली पोलीसांनी या चोरीतील 54 जलमापके खरेदी करणा-या भंगार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकाला ताब्यात घेतले.

10 दिवसांपूर्वी कळंबोलीतील सेक्टर 4 येथील शिवशक्ती सोसायटीत राहणारे संजय शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांनी जलमापके चोरी झाल्याच्या तक्रारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप गुजर यांच्याकडे आणि सिडको कार्यालयात केली होती. पोलीस अधिकारी गुजर यांनी दोन अंमलदारांची नेमणूक केल्यावर जलमापकांची भंगारात कोण विक्री करतंय का, याकडे पोलीसांनी लक्ष वेधले. पोलीसांनी पनवेल शहरातील लक्ष्मी वसाहतीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय कन्हैया गुप्ताकडून 54 जलमापके जप्त केली. यातील जलमापके बालकांनी कन्हैया याला विकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Exit mobile version