| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली मॅक्डोनल्ड येथुन पुण्याला जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसलेली महिला आपल्या चिमुकल्यासह पुणे येथे न पोहोचल्याने ती हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
कळंबोली येथून पुणे येथे जाण्यासाठी श्रेयशा अजय क्षीरसागर (26) व तिचा मुलगा नामे शिवांश अजय क्षीरसागर (2.5) कळंबोली मॅक्डोनल्ड येथुन एसटी बसमध्ये बसले. मात्र पुणे येथे न पोहोचल्याने ते दोघे हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार एस.व्ही. मासुळ यांच्याशी संपर्क साधावा.