आंबा नदी पात्रात बुडालेल्या इसमाला काढण्यात यश

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पाली/बेणसे | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावाजवळील आंबा नदी पात्रात म्हशी आणण्यासाठी गेलेला झिमा तुकाराम बावधाने हे पाण्यात बुडाल्याची माहिती पाली पोलिसांना मिळाली. रेस्क्यू टीमने पाण्यात बुडालेल्या इसमाला काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधारामुळे शोध मोहिमेत अडथळे निर्माण झाले होते. सकाळी रेस्क्यू टीमच्या साहाय्याने शोध घेतला असता पाण्यात तळाशी बुडालेल्या इसमाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. रेस्क्यू टीमचे प्रमुख सागर दहिंबेकर आणि सर्व टीम सदस्य यांनी स्वखर्चाने सामाजिक बांधिलकीची जपणूक करून तत्काळ मदतीचा हात पुढे ठेवून निस्वार्थ सेवाभावी वृत्ती दाखवून दिली. रेस्क्यू टीमच्या मानवतावादी प्रेरक कार्याचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.

Exit mobile version