मंदिराचे पावित्र्य राखणे गरजेचे

module: a; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Auto; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 28.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~25: 0.0;

भाविकांची मागणी

। उरण । वार्ताहर ।

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उरण शहरातील शनिदेव व हनुमान मंदिरात परप्रांतीय नागरिक हे झोपण्यासाठी तसेच आपल्या मोबाईलवर चित्र-विचित्र काही गोष्टी पाहण्यासाठी वापर करत असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तरी, मंदिरात दर्शनासाठी ये-जा करणार्‍या प्रत्येकाने मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी मागणी भाविक करीत आहेत.

उरण शहरातील गणपती चौकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिदेव व हनुमान मंदिरात काही दिवसांपासून शहरातील परप्रांतीय नोकरदार नागरिक हे झोपण्यासाठी व आपल्या मोबाईलवर चित्र, विचित्र काही गोष्टी पाहण्यासाठी तसेच आपला वेळ घालविण्यासाठी वापर करत असल्याचे दिसून येत आहे. मंदिर कमिटी व शासकीय अधिकारी हे जाणूनबुजून सदर बाबींकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. परंतु, त्याचा त्रास हा मंदिरात दर्शनासाठी ये-जा करणार्‍या भाविकांना सहन करावा लागत आहे. तरी, अशा परप्रांतीय नागरिकांना बंदी घालण्यात यावी, तसेच प्रत्येकाने मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version