पाऊस पडला थेंबभर, लाईट गेली रातभर

महावितरण चा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर
। अलिबाग । वार्ताहर ।
हवामान विभागाने नुकताच १४ मार्च ते १८ मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्या अनुषंगाने १५ मार्च रोजी अलिबाग तालुक्यातील बहुतांश ठिकाणी रात्री साडे दहा च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, यामुळे आंबा बागायतदार व कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यातच काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

रात्री शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत खंडित झालेला काही भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता, यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी महावितरण विरोधात शिमगा करत “पाऊस पडला थेंब भर, लाईट गेली रात भर” असे म्हणत बोंब ठोकली आहे, तसेच महावितरण विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version