कृषीवलचा पाठपुरावा; प्रशासनास जाग
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड किनार्यावरील नगरपरिषदेच्या स्वच्छतागृहाला गेल्या दोन दिवसांपासून टाळे असल्याने अनेक पर्यटकांची गैरसोय झाली. पाण्याची मोटार बंद पडल्याने पाणी उपलब्ध होत नाही, म्हणूनच ठेकेदाराने हे स्वच्छतागृह टाळे लावून बंद केले असल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले. याबाबतचे वृत्त कृषीवलमध्ये प्रसिद्ध होताच तातडीने दखल घेण्यात येऊन हे स्वच्छतागृह पूर्ववत सुरु करण्यात आले आहे.
मे महिना सुरू असल्याने शनिवारी व रविवारी विकेंडसाठी पर्यटकांची मुरुड किनारी रेलचेल असते. सध्या पर्यटकांची संख्या रोडावली असली तरी बहुतांश भागात लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्याने याचा पर्यटनावर परिणाम दिसून येत आहे. मुरुड बीचवरही पर्यटकांची तुरळक गर्दी दिसून येत आहे.
दरम्यान, येणार्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुरुड नगरपरिषदेतर्फे समुद्रकिनारीच स्वच्छतागृह बांधलेले आहेत. या स्वच्छतागृहाची जबाबदारी खाजगी ठेकेदारांना देण्यात आलेली आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छतागृहाला जवळील असलेल्या विश्रामबागेतील विहिरीतून मोटारद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो, त्या विहिरीत मोठ्या प्रमाणावर शेवाळे साचल्याने जलवाहिनी चोकअप होऊन पाणीपुरवठा बंद झाल्याने पर्यटकांची गैरसोय झाली. दरम्यान, संबंधित प्रशासनाने कृषीवलच्या वृत्ताची तात्काळ दखल घेत येथील स्वच्छतागृह पूर्ववत सुरु करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहेत.