| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द येथे अमित राय या तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी मे महिन्यात अज्ञाताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलीस तपासात ही हत्या नसून तो तरुण खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमित राय या तरुणाचा मृतदेह उसर्ली खुर्दजवळील रेल्वे पुलाच्या कामाच्या ठिकाणी दोन पिलरच्या मधोमध आढळून आला होता. त्याचा डोळ्यांमध्ये भोसकल्याच्या खुणा दिसून आल्याने पनवेल शहर पोलिसांनी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, पनवेल शहर पोलिसांनी तपास केला असता या तरुणाची हत्या झालेली नसून, तो वरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ती हत्या नव्हे तर, तरुणाचा मृत्यू
