आयटीआय प्रवेश पुन्हा सुरु

वावोशी | वार्ताहर |
कर्जत, खालापूर तालुक्यातील दहावी पास विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की ज्या विद्यार्थ्याकडून आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करण्याचे राहुन गेले असेल त्यांच्यासाठी   7 आक्टोबंर पर्यत समुपदेशन फेरीअतर्गंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी मेरिटनुसार समुपदेशन फेरीत प्रवेश मिळतील. कर्जत येथिल हाटेल क्षेत्राशी निगडीत अभ्यासक्रमासाठी देखिल जास्तीतजास्त विध्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन खालापूर आयटीआयचे प्राचार्य पद्माकर सोनावणे  यांचेकडून करण्यात येत आहे.  अधिक माहितीकरिता खालील दुरध्वनीवर संपर्क साधावा. कर्जत दुरध्वनी क्रमांक 8693869919 (श्री .चौधरी सर ) तथा खालापूर करिता दूरध्वनी क्रमांक 02192266818(श्री .चिमकर सर)

Exit mobile version