जे. एस. एम. कॉलेजमध्ये आग प्रतिबंध संरक्षण प्रशिक्षण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
’आपत्ती व्यवस्थापन व नियोजानांतर्गत (डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन) अलिबाग येथील जे. एस. एम. कॉलेज मध्ये ‘आग प्रतिबंध-संरक्षण’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रयोगशाळा, ग्रंथालय अथवा अन्य कामाचे ठिकाणी अचानक आग लागल्यास तत्काळ आग विझवण्यासाठी व आपले संरक्षण करण्यासाठी तसेच मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी काय करावे लागेल यांचे प्रशिक्षण या वेळी देण्यात आले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अ‍ॅड. गौतम पाटील या वेळी उपस्थित होते. किमान फायर एक्सिंटगविशर वापरून सर्वांना आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळण्याचे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, एन. एस. एस. चे स्वयंसेवक, एन.सी.सी. छात्र, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, डॉ. एन. एन. शेरे, मिलींद पाटील, प्रा. अ. व्ही. जाधव, एन. एस. एस. प्रा. पी. बी. गायकवाड, प्रा. सुनिल आनंद, डॉ. मोहसिन खान या वेळी उपस्थित होते.
’गॅलक्सी फायर अँड सेफ्टी सर्व्हिसेस’, अलिबाग यांचेतर्फे हे प्रशिक्षण शिबिर आयोजीत करण्यात आले होते. शारदा धुळप, राजन म्हात्रे व डॉ. मोहसिन खान यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

Exit mobile version