। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जे एस एम महाविद्यालय अलिबाग येथील सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध निवेदक संतोष बोंद्रे वा श्रुती बोंद्रे तसेच प्रसिध्द क्रिकेट समालोचक संदीप जगे उपस्थित होते.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ड. गौतम पाटील याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे पहिल्या सत्रातील मार्गदर्शक संतोष बोंद्रे व श्रुती बोंद्रे यांनी सूत्रसंचालन व निवेदन कला विकसित करण्यासाठी आवश्यक असणार्या वाचन, श्रवण तसेच इतर तयारीबाबत मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात संदीप जगे यांनी क्रिकेट समालोचन क्षेत्रातील व्यावसायिक संधी ओळखण्याची गरज विशद करून विद्यार्थ्यांना या कलेत तरबेज होण्यासाठी महत्त्वाचे धडे दिले.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, जनता शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष मार्गदर्शन केले. प्रा. आशुतोष मेहेंदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक कार्यक्रम समिती अध्यक्ष डॉ. प्रेम आचार्य तसेच इतर सर्व समिती सदस्यांनी या कार्यशाळेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.