पेण | वार्ताहर |
हमरापूर विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्त्ये तथा माजी मंत्री स्व. मोहन पाटील यांचे खंदे सर्मथक जगन्नाथ सखाराम पाटील यांचे नुकतेच वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. हमरापूर विभागामध्ये शे.का.पक्षाची बाजू मजबूतपणे सर्वसामान्यांपर्यंत मांडण्याचे काम जगन पाटील यांनी केले आहे. त्यांच्यावर तांबडशेत येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, शैक्षणिक व क्रीडा श्रेत्रातील मान्यवर उपस्थित होते.