सात शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग
| नेरळ | प्रतिनिधी |
हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने मानिवली येथील हुतात्मा स्मारकात शिक्षण विभागाच्या दहिवली मालेगाव केंद्राच्यावतीने ‘जागर क्रांतीचा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या सात प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी समूह गीते, क्रांती गीते आणि समर गीते सादर करून वहावा मिळवली.
हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदानाने पावन झालेली त्यांची जन्मभूमि मानिवली येथे पूर्व संध्येला जागर क्रांतीचा हा कार्यक्रम सादर करण्यात येतो. यामध्ये केंद्र ददिवली-माले अंतर्गत 10 शाळांचा सामावेश करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला विठ्ठल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळी विस्तार अधिकारी प. शो. म्हात्रे, प्रशासक संजय चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग म्हसे, स्मारक समिती अध्यक्ष प्रवीण डायरे, शाळा व्यवस्थापन समिती जितेंद्र गवळी, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पाटील, मुख्याध्यापक राठोड, पोलीस पाटील रामचंद्र गवळी, वामनबुवा गवळी, गोपाळ पाटील, आगरी संघटना अध्यक्ष संतोष पेरणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात शाळा मानिवलीच्या विद्यार्थींनी गणेश वंदनेवे केली. तसेच, वकृत्व सामायिक नाटक आणि पोवाडे यांच्या सहभाग घेण्यात आला होता.
जागर क्रांतीचा या कार्यक्रमात माणिवली, दहिवली, मालेगाव, झेंडेवाडी, वंजारपाडा, बिरदोले, कोदिवले, अवसरे, वरई या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संजयोती कांबरी यांनी केले. यावेळी मानिवली शाळेने गणेश वंदना, दहिवली शाळेने वक्तृत्व, झेंडेवाडी शाळेने ‘ही जन्मभूमी ही कर्मभूमी’, वंजारपाडा शाळेने ‘बंदिया बंदिया’, मानिवली शाळेने ‘विर हुतात्मा गीत’, बिरदोले शाळेने नाटक ‘चलाऑक्सिजन पेरू या’, कोदिवले शाळेने समूह नृत्य ‘खंडोबाची कारभारीन’, वरई शाळेने समूह नृत्य ‘देव मल्हारी’, मानिवली शाळेने नाटक ‘स्वातंत्र्याचा रणसंग्राम’, मालेगाव शाळेने समुह नृत्य ‘सुनो गोरसे दुनियावालो’, अवसरे शाळेने समूह गीत ‘स्वातंत्र्याच्या लढ्यात’, मानिवली शाळेने समुहानृत्य ‘स्वर्गात आकाशगंगा’, झेंडेवाडी शाळेने समुहनृत्य ‘झुलवा पाळणा’, वंजार पाडा शाळेने पोवाडा ‘वंदू शूराला क्रांतीवीराला’, बिरदोले शाळेने समूहगीत ‘उत्तुंग आमची उत्तर सीमा’ तसेच समूह नृत्य ‘बेटी हिंदुस्तान की’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘बानुबाईची मेंढरं’, ‘शिवबांचे नाव’, ‘हिमालयाशी सांगते नाते’, निकोप महाराष्ट्राची लोकधारा’, मानिवली पोवाडा ‘मर्द मावळा’, दहिवली ‘मेरी मिट्टी’ व पूजा डायरे वकृत्व इत्यादी कार्यक्रम सादर झाले.





